32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीयबिहारमध्ये वीज पडल्यामुळे 83 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वीज पडल्यामुळे 83 जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

बिहार : बिहारमध्ये वीज पडून 83 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (25 जून) संध्याकाळी साडे सहावाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील वेगवेगळ्या भागात वीज पडल्यामुळे 83 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक मृत्यू हे गोपालगंज जिल्ह्यात झाले आहेत. इथं वीज पडल्यामुळे 13 लोकांनी प्राण गमावले आहेत.बिहारमधल्या जवळपास 23 जिल्ह्यांमध्ये वीज पडून जीवित तसंच वित्तहानी झाली आहे. मधुबनी आणि नवादामध्ये प्रत्येकी 8-8 मृत्यूमुखी पडले आहेत. बिहार सरकारने सर्व मृतांच्या नातेवाईकांना चार लाख नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही काही ठिकाणी वीज पडून जीवितहानी झाल्याची माहिती मिळत आहे. देवरियामध्ये वीज पडून पाच जणांचा मृत्यू झालाय तर अनेक लोक जखमी झाले आहेत.

Read More  दिलासादायक बातमी : कोरोनाग्रस्तांवर उपचाराशिवाय केल्या 1700 यशस्वी प्रसूती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या