24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीय८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही मोठी आहे. दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूंची संख्याही वाढत असून, एकूण मृत्युसंख्या ९२ हजारांवर गेली आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ०५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच यानंतर देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५८ लाखांचा टप्पा पार केला आहे.

गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ०५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून १ हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५८ लाख १८ हजार ५७१ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ७० हजार ११६ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ४७ लाख ५६ हजार १६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर आतापर्यंत ९२ हजार २९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

रुग्णसंख्येने ओलांडला राज्यात १३ लाखांचा टप्पा
राज्यात कोरोना साथीने थैमान घातले असून आणखी ४१६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच एकूण संख्येने १३ लाखांचा टप्पा आज पार केला आहे. राज्यात आजवर १३ लाख ७५७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ९ लाख ९२ हजार ८०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ३४ हजार ७६१ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात १९ हजार ५९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून १७ हजार ७९४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ७६.३३ टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या २ लाख ७२ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या