18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्राइमदिवसाला ८७ स्त्रियांवर बलात्कार

दिवसाला ८७ स्त्रियांवर बलात्कार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील १९ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देशभरातच महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नॅशनल क्राईम ब्युरोच्या ताज्या अहवालानुसार देशात दिवसाला ८७ महिलांवर बलात्कार होतात. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये २०१८ या वर्षाच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.२०१९ मध्ये आतापर्यंत नोंदवलेल्या तक्रारींनुसार भारतात दररोज सरासरी ८७ बलात्कार होत असल्याचे दिसून येते.

२०१९ या वर्षाच्या सुरूवातीच्या काही महिन्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे ४ लाख ५ हजार ८६१ गुन्हे दाखल झाले आहेत. वर्ष २०१८ च्या तुलनेत सात टक्क्यांनी अधिक आहेत. २०१९ मध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये ७.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१८ मध्ये एक लाख महिलामांगे नोंदविलेला गुन्हेगारीचा दर ५८.८ टक्के होता. तर २०१९ मध्ये हा दर ६२.४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

२०१८ मध्ये देशात महिलांवरील अत्याचाराच्या ३ लाख ७८ हजार २३६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.अहवालानुसार २०१८ मध्ये, देशभरात, ३३,३५६ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली होती, तर २०१७ मध्ये ही संख्या ३२,५५९ इतकी होती. ‘पती किंवा त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या अत्याचाराचे प्रमाण ३०.९ टक्के आहे.

विनयभंगाच्या तक्रारीचे प्रमाण २१.८ टक्के आहे. तर स्त्रियांचं अपहरण आणि अत्याचाराचे प्रमाण हे १७.९ टक्के आहे, असं एनसीआरबीचा गुन्हेगारी अहवाल सांगतो.एनसीआरबीने ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि ५३ शहरांमधील माहिती एकत्रित करून हा अहवाल तयार केला आहे.

बालकांवरील अत्याचारातही मोठी वाढ
एनसीआरबीच्या एकत्रित आकडेवारीनुसार बालकांवर होणा-या अत्याचाराशी संबंधित प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. २०१८ पासून २०१९ पर्यंत बालकांवर होणा-या अत्याचाराच्या घटनांमध्ये ४.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये बालकांवरील अत्याचाराच्या एक लाख ४८ हजार घटनांची नोंद झाली आहे. यातील ४६.६ टक्के प्रकरणे अपहरणाची तर ३५.५ टक्के प्रकरणे ही लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या