22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीय८९ वर्षांच्या आजोबांची सतत सेक्सची मागणी

८९ वर्षांच्या आजोबांची सतत सेक्सची मागणी

एकमत ऑनलाईन

सुरत : गुजरातमधल्या हेल्पलाईन क्रमांकावर एक फोन आला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या या हेल्पलाईन नंबरवर एका ८७ वर्षीय महिलेने फोन केला होता. तिचे म्हणे ऐकून हेल्पलाईनमध्ये काम करणारेही चक्रावले. अशी कोणती समस्या तिने मांडली होती?

या ८७ वर्षी महिलेने सतत सेक्सची मागणी करणा-या आपल्या ८९ वर्षीय पतीला कंटाळून फोन केला होता. आपण आजारी असल्याने सतत त्याच्याशी सेक्स करू शकत नाही त्यामुळे त्याच्यापासून सुटका मिळावी, अशी मागणी या ८७ वर्षीय महिलेने केली आहे. अभयम या हेल्पलाईनकडे हा फोन आला होता. तिथल्या अधिका-यांनी याविषयी माहिती दिली आहे. अभयमच्या अधिका-यांनी सांगितले की, दोघांमध्ये अनेक वर्षांपासून निरोगी संबंध होते. पण त्यानंतर एका वर्षांपूर्वी ही महिला आजारी पडली आणि ती अंथरुणाला खिळून राहिली. तिला हालचालही करणं अवघड जात आहे. आपला मुलगा आणि सून यांच्या मदतीने तिला चालावे लागते. तिच्या पतीलाही या सगळ्याची कल्पना आहे, पण तरीही पती तिला सातत्याने सेक्स करण्यास भाग पाडतो.

नकार दिल्यास आरडाओरड
या महिलेचा ८९ वर्षीय पती निवृत्त इंजिनीयर आहे. त्याने महिलेकडे सेक्सची मागणी केली आणि महिलेने नकार दिला की तो जोरजोरात आरडाओरडा करतो, चिडचिड करतो. मुलावरही ओरडतो. त्यामुळे हा सगळा प्रकार शेजारपाजा-यांनाही कळतो. म्हणून परिवाराने हेल्पलाईन क्रमांकावर मदत मागितली. त्यानंतर हेल्पलाईनची टीम त्यांच्या घरी आली आणि त्यांनी पतीचे समुपदेशन केले. तसेच त्याला सेक्सॉलॉजिस्टकडे जाण्याचा सल्लाही दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या