28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटकात क्रुझर-ट्रकच्या अपघातात ९ ठार

कर्नाटकात क्रुझर-ट्रकच्या अपघातात ९ ठार

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यात जीप आणि ट्रकच्या धडकेत तीन मुलांसह ९ जण ठार झाले आहेत, तर ११ जण जखमी झाले आहेत. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर सिराजवळ घडली आहे.
तुमकुरू जिल्ह्यातील बालेनहल्ली गेटजवळ जीप आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृत हे रोजंदारी मजूर असून ते बंगळुरूला जात होते. पोलिस अधीक्षक राहुलकुमार शाहपूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तुमकुरू जिल्ह्यातील सिराजवळ राष्ट्रीय महामार्गावर जीप ट्रकला धडकल्याने तीन मुलांसह नऊ जण ठार झाले, तर ११ जण जखमी झाले असे पोलिस अधीक्षक राहुल यांनी सांगितले. हे सर्व रोजंदारी मजूर बंगळुरूला जात होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या