22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये दोन बसचा भीषण अपघातात ९ ठार

केरळमध्ये दोन बसचा भीषण अपघातात ९ ठार

एकमत ऑनलाईन

पलक्कड : केरळमध्ये दोन बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये ३८ जण जखमी झाले आहेत. पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरीमध्ये ही दुर्घटना घडली असून दोन भरधाव बसची समोरासमोर धडक झाली. बस एर्नाकुलमच्या मुलंथुरुथीमधील बेसलियस स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र पलक्कड जिल्ह्याच्या वडक्कनचेरी इथे केएसआरटीसीच्या बसला धडकली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या बसने केएसआरटीसी बसला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर बस दलदलीमध्ये कोसळली. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना ३८ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या