Tuesday, September 26, 2023

पाच महिन्यात ९३ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर: सहा महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत म्हणजेच गेल्या पाच महिन्यांमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी ९३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू आणि काश्मीर या भागांमध्ये ही कारवाई झाली आहे.आम्ही दि. ८ जून रोजी पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये ९३ दहशतवाद्यांचा खात्मा केला असून, मागील दोन दिवसांत आम्ही नऊ दहशतवाद्यांना ठार केले आहे.

या दोन दिवसात भारतीय लष्कराचा एकही जवान शहीद झालेला नसल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. काश्मीर खोरे आणि एलओसी या दोन्ही ठिकाणी दहशतवाद विरोधी कारवाया सुरु आहेत, असेही लष्कराने स्पष्ट केले आहे. दहशतवाद्यांचा टॉपचा म्होरक्या रियाझ नायकू यालाही ठार करण्यात आम्हाला यश आले आहे. तसेच जुनैद सेहराईलाही आम्ही ठार केले आहे. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दोन दहशतवादी संघटनांचे ते दहशतवादी होते, असेही लष्कराने म्हटले आहे.

Read More  सीमेवर पुन्हा चिनी सैन्याच्या वेगवान हालचाली

गत काही दिवसांत एकही जवान शहीद नाही
मात्र दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जरी आम्ही यश मिळवले असले तरीही सुरक्षा दलांचेही नुकसान झाले आहे. केरन सेक्टरमध्ये गेल्या महिन्यात पॅरा मिलिटरीचे पाच जण शहीद झाले. त्यांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र या कारवाईत या पाच जणांचाही मृत्यू झाला. तसेच मे महिन्यात झालेल्या एका दहशतवादविरोधी कारवाईत एक कर्नल आणि तीन इतर लष्कराचे जवान शहीद झाले. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये एकही जवान किंवा अधिकारी शहीद झालेला नाही, असेही लष्कराच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

येत्या काळात दहशतवाद्यांचा जास्त मोठया प्रमाणात खात्मा होण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. आणखी दहशतवादी शोधून त्यांना ठार करणे हे आमचे पुढील लक्ष्य आहे, असेही लष्कराने स्पष्ट केले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या