23.3 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयलसीकरणानंतर ९७.३८ टक्के लोक झाले सुरक्षीत

लसीकरणानंतर ९७.३८ टक्के लोक झाले सुरक्षीत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस वाढणा-या कोरोना रुग्णांची आकडेवारी भयानक आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लस हे सर्वात मोठे शस्त्र म्हणून पाहिले जात आहे. कोरोना लसीवरील नुकत्याच केलेल्या स्टडीमध्ये असेही समोर आले आहे की, लसीकरण करण्यात आलेले ९७.३८ टक्के लोक कोरोना संक्रमणापासून सुरक्षित राहिले आहेत. तसेच, जे लोक संक्रमित झाले आहेत, त्यापैकी केवळ ०.०६ टक्के लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

शनिवारी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने लस घेतल्यानंतर संसर्ग झालेल्या लोकांवर केलेल्या स्टडीचा निकाल समोर आला आहे. या स्टडीमध्ये असे म्हटले आहे की, कोरोना लसीकरण झालेल्या लोकांमध्ये संक्रमणाची शक्यता खूपच कमी होती आणि ज्यांना संसर्ग झाला त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले गेले नाही किंवा त्यांचा मृत्यू झाला नाही. नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने ही स्टडी अशा आरोग्य कर्मचा-यांवर केली आहे की, ज्यांना कोव्हिशिल्ड लस देण्याआधी १०० दिवसांत कोविडची लक्षणे आढळली.

अंशत: होतेय ब्रेक थ्रू संक्रमण
भारतात लसीकरण मोहिमेदरम्यान कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लसीकरणानंतरही काही लोकांना संसर्ग होत आहे. ज्याला ब्रेकथ्रू संक्रमण असे म्हणतात. हे संक्रमण काही व्यक्तींमध्ये अंशत: आणि संपूर्ण लसीकरणानंतर उद्भवू शकते, असे अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे ग्रुप मेडिकल डायरेक्टर डॉ़ अनुपम सिब्बल यांनी सांगितले.

तब्बल ३२३५ आरोग्य कर्मचा-यांवर संशोधन
ही स्टडी ३२३५ आरोग्य कर्मचा-यांवर करण्यात आली. स्टडीनुसार असे आढळले आहे की, यापैकी ८५ आरोग्य कर्मर्चा­यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ६५ कर्मर्चा­यांना (२.६२%) लसीचे दोन्ही डोस दिले गेले, तर २० (२.६५%) लोकांला लसीचा फक्त एकच डोस मिळाला. यादरम्यान, महिलांवर व्हायरसचा जास्त परिणाम दिसून आला. विशेष म्हणजे, वृद्ध किंवा लहान वयातील संसर्गावर कोणताही फरक पडला नाही.

देश सोडून पळालो नाही; सायरस पुनावाला यांचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या