19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशातील १२ वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक

मध्य प्रदेशातील १२ वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक

एकमत ऑनलाईन

भोपाळ : आतापर्यंत तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकली असेल, परंतु लहान मुलाच्या आकस्मिक मृत्यूमध्ये हृदयविकाराची लक्षणे पहिल्यांदाच दिसली आहेत. हे प्रकरण मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात मृतावस्थेत आलेल्या मनीष जाटव या १२ वर्षीय शालेय विद्यार्थ्यासोबत ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिंडच्या जामना रोड येथील रहिवासी कोमल जाटव यांचा मुलगा मनीष हा घरातून इटावा रोडवर असलेल्या एका खासगी शाळेत शिकण्यासाठी गेला होता. शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी तो बसमध्ये चढला असता, सीटवर बसताच तो अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर बस चालकाने शाळेच्या मुख्याध्यापकांना याची माहिती दिली. त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, तो शुद्धीवर न आल्यामुळे चौथी इयत्तेत शिकणा-या मनीषच्या कुटुंबीयांना तात्काळ माहिती देण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या