21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयपाकच्या ३ वर्षीय मुलाने ओलांडली सीमा

पाकच्या ३ वर्षीय मुलाने ओलांडली सीमा

एकमत ऑनलाईन

फिरोजपूर : चुकून सीमा ओलांडलेल्या तीन वर्षांच्या पाकिस्तानी मुलाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानच्या सुरक्षा जवानांच्या ताब्यात दिले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमधून एका पाकिस्तानी मुलाला पकडले. बीएसएफने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी ७.१५ च्या सुमारास फिरोजपूर सेक्टरच्या १८२ बीएन बीएसएफच्या जवानांनी तीन वर्षाच्या एका पाकिस्तानी मुलाला पकडले. हे मुल सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसले होते.

बीएसएफने एका निवेदनातून याबाबतची माहिती दिली आहे. पाकिस्तानी हद्दीतून भारीतय हद्दीत आलेल्या मुलाला काहीही बोलता येत नव्हते. या मुलाला बीएसएफच्या सुरक्षित कोठडीत ठेवण्यात आले होते. अनवधानाने हद्द ओलांडल्यामुळे बीएसएफने शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता पाक रेंजर्सशी संपर्क साधला. यानंतर मुलाला पाक रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आले, असे बीएसएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

यापूर्वी २९ जून रोजी भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील सैन्यात बैठक झाली होती. बीएसएफच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, २९ जून रोजी राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय आघाडीवर भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सैन्यादरम्यान ग्राउंड कमांडर स्तरावरील बैठक झाली. राज्यातील बारमेर जिल्ह्यातील मुनाबाव येथे मंगळवारी ही बैठक झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या