नवी दिल्ली : निक्की यादव खून प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. निक्कीला मारल्यानंतर साहिल तिला रस्ता अपघात दाखविणार होता, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने निक्कीला कारमधून ढकलून देण्याची योजना आखली होती. पण, साहिलला हा प्लॅन अंमलात आणता आला नाही. त्यानंतर त्याने निगमबोध घाटावर निक्कीची हत्या केली. दुसरीकडे साहिल आणि अन्य आरोपींची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
साहिलचे वडील वीरेंद्र यांच्यावर यापूर्वी खुनासह अनेक गुन्हे दाखल असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. हे प्रकरण १९९७ मध्ये गावात झालेल्या भांडणाचे होते. जिथे हत्येनंतर वीरेंद्र सिंहला अटक करण्यात आली होती. दोषी आढळल्यानंतर काही वेळातच त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले. त्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
माहिती असताना केली मदत
निक्की यादवच्या हत्येपूर्वी वडिलांना सर्व काही माहित होते. तरीही त्याने साहिलला साथ दिली. वीरेंद्रने स्पष्टपणे सांगितले होते की, त्याला निक्कीला कोणत्याही मार्गाने बाहेर काढायचे आहे. चौकशीदरम्याही साहिलचे वडील वीरेंद्र यांना याबाबत कोणताही पश्चाताप झाला नाही. लग्नानंतर निक्कीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची तयारी ते सर्व करत होते.