19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयइंदोरच्या भाविकाने राम मंदिर निर्मितीसाठी पाठवले पोकलेन मशीन

इंदोरच्या भाविकाने राम मंदिर निर्मितीसाठी पाठवले पोकलेन मशीन

एकमत ऑनलाईन

इंदोर (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर मंदिर निर्मितीच्या कामास वेग आला आहे. याचा उत्साह भाविकांमध्येही दिसून येत आहे. मंदिर निर्मितीच्या कामासाठी राम भक्तांकडून स्वयंस्फूर्तीने हातभार लावला जात आहे, अशाच प्रकारे मध्य प्रदेशातील देवरुडीया येथील एका राम भक्ताने राम मंदिर निर्मितीसाठी चक्क पोकलेन मशीन पाठवून दिल्याची माहिती समोर आली आहे.

दिनेश बेनिवाल असे त्या रामभक्ताचे नाव आहे. त्यांनी हे पोकलेन मशीन राम मंदिर निमार्णाचे काम पूर्ण होईपर्यंत तेथेच वापरले जाणार असल्याचे सांगितले. भाजप जनरल सेक्रेटरी कैलास विजयवर्गीय यांनी या पोकलेन मशीनची पूजा केली.या मशीन सोबत ब्रेकर ही पाठवण्यात आला आहे, याच मशीनच्या साहाय्याने मंदिराचा पाया खोदला जाणार असल्याचे विजयवर्गीय म्हणाले.

७३ वा स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरा

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या