32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयसरकारपेक्षा भिन्न मत म्हणजे देशद्रोह नाही

सरकारपेक्षा भिन्न मत म्हणजे देशद्रोह नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजपसरकारच्या कोणत्याही निर्णयाला केलेल्या विरोधानंतर संबंधिताला देशद्रोही ठरविण्यासाठी भाजपप्रेमी लोकांमध्ये स्पर्धाच सुरु होत असते. मात्र सर्वोच्च न्यायालयानेच आता आक्रमकतेविरोधात आसूड ओढला आहे. सरकारच्या मतापेक्षा पुर्णपणे वेगळे मत व्यक्त करणे ही ज्याची त्याची इच्छा आहे. केवळ सरकारच्या निर्णसाविरोधात मतप्रदर्शन केल्यावरुन एखाद्याला देशद्रोही ठरविता येत नाही, अशी तंबीच सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिली आहे. तसेच यावेळी न्यायालयाने जम्मू काश्मीरचे खासदार फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल देशद्रोहाची याचिकाही फेटाळून लावली.

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द करण्यात आले होते. त्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी भारताविरोधात पाकिस्तान आणि चीनकडून मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्ता सादर करु शकला नाही. त्यामुळे ही याचिका फेटळाली.

याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंड
फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात केलेल्या याचिकेत त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा दाखला देण्यात आला होता. कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर फारुख अब्दुल्ला यांनी टीका केली होती. त्याच्याच आधारे ही याचिका करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोह केल्याचा कोणताही पुरावा नसताना केवळ सरकारच्या मताविरुद्ध मतप्रदर्शन केल्याने त्यांना देशद्रोही ठरविता येत नसल्याचा निर्वाळा दिला. एवढेच नव्हे तर याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंडही ठोठावला.

राज्यात आज ७ हजार ८६३ नवीन कोरोनाबाधित वाढले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या