37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनावर औषध शोधल्याचा दावा करणा-या डॉक्टराला दंड

कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करणा-या डॉक्टराला दंड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, प्रत्येकजण लसीची वाट बघत आहे. भारतासह अनेक देशात सध्या कोरोनाच्या लसीच्या चाचण्या सुरू असतानाच एका आयुवेर्दीक डॉक्टरनं कोरोनावर औषध सापडल्याचा दावा केला आहे. मात्र हा दावा करणं डॉक्टराच्याच अंगलट आला. आपण शोधलेली औषधी देशभरात वापरण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्याची अजब मागणी करणा-या या डॉक्टरची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं १०,००० दंड ठोठावला.

जगभरात दररोज लाखो लोकांना कोरोना चा संसर्ग होत आहे. अनेकांचा मृत्यूही झाला असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे लसीच्या चाचण्याही युद्धपातळीवर सुरू आहेत. अशात हरयाणातील एका आयुर्वेदिक डॉक्टरनं कोरोना वर औषध सापडल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर ओमप्रकाश वेद ज्ञानतारा या बीएएमएस डॉक्टरनं थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

डॉक्टर ज्ञानतारा यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत जगभरात ८ लाख लोकांचा बळी घेणा-या कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला. त्याचबरोबर कोरोनावर आपण शोधलेलं औषध डॉक्टर व रुग्णालयांनी वापरायला हवं असं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

सुनावणी वेळी डॉक्टर ज्ञानतारा यांनी आपण कोरोनावर शोधलेली औषधी वापरण्यासाठी केंद्र सरकारला न्यायालयानं आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती. दरम्यान, सुनावणी अंती न्यायालयानं दाखल करण्यात आलेली जनहित याचिका चुकीची असल्याचं सांगत फेटाळून लावली. त्याचबरोबर अशा विचित्र याचिकासंदर्भात समाजात संदेश देण्यासाठी याचिकाकर्त्या डॉक्टरला १०,००० रुपये दंड ठोठावला. डॉक्टर ओमप्रकाश ज्ञानतारा यांचं शिक्षण बीएएमएसपर्यंत झालं आहे. सध्या ते आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून उपचार करतात.

केंद्र सरकार विरोधात कृउबा कर्मचा-यांचा संप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या