24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयहफ्ता वसुलीसाठी गेलेल्या कर्मचा-याने शेतक-याच्या गरोदर मुलीला चिरडले

हफ्ता वसुलीसाठी गेलेल्या कर्मचा-याने शेतक-याच्या गरोदर मुलीला चिरडले

एकमत ऑनलाईन

रांची : झारखंड येथे हफ्ता वसुलीसाठी आलेल्या एका फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याने शेतक-याच्या गरोदर मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शेतक-याच्या गरोदर मुलीचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने खळबळ पसरली आहे. तसेच सदर कर्मचा-याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील बळीयानाथ येथील एका शेतक-याने हफ्त्यावर ट्रॅक्टर घेतले होते. ट्रॅक्टरचे हफ्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीचा एक कर्मचारी वसुलीसाठी आला होता पण शेतक-याकडे देण्यासाठी पैसे नसल्याने कर्मचारी ट्रॅक्टर घेऊन जात होता. त्यानंतर शेतक-याच्या गरोदर मुलीने ट्रॅक्टर वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण कर्मचा-याने मुलीला क्रूरपणे चिरडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे. निखिलेश मेहता असे या शेतक-याचे नाव असून ट्रॅक्टरचा एक लाखाचा हफ्ता थकल्यामुळे कर्मचारी वसुलीसाठी गेले असल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या