26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयपाटणाहून दिल्लीला जाणा-या विमानाला आग

पाटणाहून दिल्लीला जाणा-या विमानाला आग

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारची राजधानी पाटणाहून दिल्लीला जाणा-या स्पाइसजेटच्या विमानात आग लागली. विमानात अनेक प्रवासी होते. पाटणा विमानतळावर विमानाचे पुन्हा सुरक्षित लँडिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. विमानाच्या इंजिनला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन अ‍ॅलर्ट मोडवर आले.

विमान उतरल्यानंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढले जात आहे. विमानाने उड्डाण करताच एका इंजिनमधून धूर निघताना दिसला. यानंतर विमानाने विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाच्या इंजिनमध्ये आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही असे पाटणाच्या एसएएसपीने मीडियाला सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या