22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयपेट्रोल बॉम्ब फेकून हिंदू नेत्याची भरचौकात हत्या

पेट्रोल बॉम्ब फेकून हिंदू नेत्याची भरचौकात हत्या

एकमत ऑनलाईन

सिंगभूम : हिंदुत्ववादी नेते कमल देवगिरी यांच्या हत्येनंतर झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात दोन समुदायांमधील वाढता तणाव लक्षात घेता, कलम १४४ लागू करण्यात आलंय. या नेत्याच्या हत्येनंतर मृतदेह रात्री उशिरापर्यंत ठेऊन दगडफेकही करण्यात आली. यानंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले.

गिरीराज सेना नावाची ंिहदूवादी संघटना चालवणारे कमल देवगिरी यांची तीन गुन्हेगारांनी पेट्रोल बॉम्ब फेकून हत्या केली. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. सध्या गुन्हेगारी घटनांमुळं राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. गुन्हेगारांवर कायदा आणि पोलिसांचा धाकच राहिला नसल्याची भावना व्यक्त होत आहे. गुन्हेगारांकडून सातत्यानं ंिहसक घटना घडत आहेत. काही प्रकरणांमध्ये अटक होत असली, तरी गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

तणावानंतर कलम १४४ लागू
पश्चिम सिंगभूमच्या चक्रधरपूरमध्ये गिरीराज सेना नावाची संघटना चालवणारे हिंदू नेते कमल देवगिरी यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. ंिहदूत्ववादी नेत्याच्या या हत्येनंतर संपूर्ण चक्रधरपूरमध्ये वाढता तणाव पाहता प्रशासनानं कलम १४४ लागू केलं आहे. चक्रधरपूरच्या तरुणांमध्ये गिरीराज सेना प्रमुख कमल देवगिरी यांची लोकप्रियता झपाट्यानं वाढत होती. ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते, त्यामुळंच त्यांची हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चक्रधरपुरातील भारत भवन इथं असलेल्या सरस्वती शिशू विद्या मंदिर तुलसी भवनजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन गुन्हेगारांनी शनिवारी सायंकाळी कमल यांची हत्या केली. घटनेनंतर गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या