22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयगाझियाबादमधील झोपडपट्टीत भीषण आग, १०० गायींचा होरपळून मत्यू

गाझियाबादमधील झोपडपट्टीत भीषण आग, १०० गायींचा होरपळून मत्यू

एकमत ऑनलाईन

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील इंदिरापुरम भागातील झोपडपट्टीत भीषण आगीची घटना घडली. इंदिरापुरमच्या झोपडपट्ट्यांतील आगीच्या ज्वाळा दुरूनच दिसत होत्या. या दुर्घटनेत १०० गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तानुसार, झोपडपट्टीत ठेवलेल्या घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.

इंदिरापुरमच्या झोपडपट्टीत आग लागल्यानंतर लोकानी अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्याघटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले. श्री कृष्ण गोसेवेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की, रद्दीमध्ये लागलेल्या आगीमुळे १०० हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. सर्व गायी दुध न देणा-या होत्या.’या भीषण दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. गाझियाबादचे डीएम आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या