25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयघटस्फोटानंतर भेटायला आलेला नवरा पाहुणा समजावा

घटस्फोटानंतर भेटायला आलेला नवरा पाहुणा समजावा

एकमत ऑनलाईन

चेन्नई : घटस्फोट झालेल्या जोडप्यातील भेटीच्या अधिकाराशी संबंधित एक प्रकरण हाताळताना मद्रास उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. वेगळे झालेल्या जोडीदारांनी मुलांसमोर दया आणि सहानुभूतीने एकमेकांशी वागले पाहिजे अशी सुनावणी एका याचिकेवर करण्यात आली आहे.

या सुनावणी दरम्यान न्यायाधीश म्हणाले, पती आणि पत्नीमध्ये वैयक्तिक कारणांमुळे वाद असतील तरीही मुलांसमोर त्यांनी जोडीदाराशी सहानुभूतीने वागावे. मुलांकडे लक्ष देऊन जोडीदाराला किमान पाहुण्यासारखी वागणूक द्यावी. कारण आपल्या देशात पाहुण्याला ‘अतिथी देवो भव’ मानले जाते. संबंधित पालकांनी पाल्यांच्या मनात वडील किंवा आईविषयी कोणताही द्वेष किंवा भीती बाळगली जाईल असे कृत्य करू नये किंवा मुलांना तसे शिकवू नये.

यामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी हे धोक्याचे ठरू शकते. एका प्रकरणात वडिलांना आठवड्यातील काही काळासाठी मुलाला त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाण्याची परवानगी होती. मात्र, पत्नीने त्याची अंमलबजावणी करण्यात अडचण येत असल्याचे सांगून दुरुस्तीची मागणी केली होती.

यानंतर कोर्टाने या आदेशात बदल करून वडिलांना दर शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी आईच्या घरी मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, या सुनावणीत पती-पत्नींनी कोणतीही तक्रार न करता न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे. याशिवाय पालकांची विभक्त होण्याची इच्छा नसल्यास मुलांना पालकांसोबत वेळ घालवण्यासाठी तयार करावे असे निर्देश न्यायालयाने देण्यात आले होते.

मुलांमध्ये व्देष टाळण्याचा प्रयत्न
मुलांना आपल्या दोन्ही पालकांसोबत सुरक्षित आणि प्रेमळ नातेसंबंध निर्माण करण्याचा अधिकार आहे. अधिकार असताना मुलांना पालकांच्या प्रेमापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांचे बाल शोषण करण्याचा प्रकार होऊ शकतो. द्वेष ही भावना नैसर्गिकरीत्या येते, त्यामुळे यासंदर्भात पालकांनी सजग राहण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुलांना आई-वडिलांचे प्रेम मिळण्याचा अधिकार
प्रत्येक मुलाला आई-वडील असे दोघांचेही प्रेम मिळण्याचा अधिकार आहे असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सांगितले की, पती-पत्नीमध्ये कितीही मतभेद असले, तरी मुलांचा एकमेकांवर हक्क असणार आहे. त्यामुळे कोणत्याही मुलाला पती किंवा पत्नीचा सहवास नाकारला जाऊ शकत नाही. याप्रकरणी २९ जुलै रोजी संबंधित पत्नीला पतीला मुलांसोबत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या