25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय अबब एक किलो गुळ ५ हजार रुपयांना

अबब एक किलो गुळ ५ हजार रुपयांना

एकमत ऑनलाईन

सहारणपूर : एखादा शेतकरी जर नावीन्यपुर्ण मार्ग चोखाळणारा असेल तर त्याला शेतीत कधीच नुकसान होऊ शकत नाही. उत्तरप्रदेशमधील सहारणपूरच्या एका शेतक-याने हे सिद्ध करुन दाखवले आहे. शेतक-याने सेंद्रिय गुळ निर्मिती करुन त्याची प्रतिकिलो ५ हजार रुपयाला विक्री करुन दाखवली आहे. एवढेच नव्हे तर त्याचा हा सोन्यासारखी किंमत असलेला गुळ खरेदी करण्यासाठी ग्राहक त्याच्या दारापर्यंत येत असल्याचे तो सांगतो.

उत्तरप्रदेशमधील सहारणपूर जिल्ह्यातील मुबारकपुरच्या संजय सैनी या शेतक-याची ही यशकथा आहे. संजय यांची १० एकर शेती असून तिच्यामध्ये ते संपुर्ण सेंद्रीय पद्धतीने ऊसाची शेती करतात. एवढेच नव्हे तर त्या ऊसाची साखर काढण्यासाठी साखर कारखान्यात विक्रीही ते करीत नाहीत. साखर कारखान्यात रसायनांचा वापर करुन साखर निर्मिती केली जाते, मात्र अशी रसायनयुक्त साखरही आपल्या ऊसापासून बनू नये असा त्यांचा अट्टाहास. त्यासाठी ते स्वत:च गुळाची निर्मिती करतात. गुळ निर्मितीही संपुर्ण रसयानविरहीत व सेंद्रिय पद्धतीने ते करतात. अर्थात त्यांच्या नाविन्यपुर्ण विचारांची तर ही केवळ झलकच आहे. त्याहूनही नाविन्य म्हणजे त्यांनी गुळाची निर्मिती ,गुणवत्ता इतक्या उंचीवर नेऊन ठेवली आहे की त्यांच्या एक किलो गुळाला चक्क ५ हजार रुपयांपर्यंत दराने ग्राहक घरी येऊन खरेदी करतात. सामान्य दर्जाचा त्यांचा गुळ ८० रुपये किलो दराने विकला जातो. मात्र अत्युच्च दर्जाचा गुळ ५ हजार रुपयांना विकला जातो.

५ हजाराच्या गुळाचे वैशिष्ट्य काय?
सैनी जवळपास ७७ प्रकारच्या गुळांची निर्मिती करतात. ५ हजार रुपये प्रतिकिला दर असलेला गुळ हा एखाद्या च्यवनप्राशेक्षाही ताकदवान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यात ते विविध रोगांवर उपयुक्त अशा जडी-बुटींच्या मात्राही एखाद्या ग्राहकाच्या किंवा विशिष्ठ रोगाच्या गरजांनूसार मिसळतात. स्वर्ण भस्म,चांदी भस्म आदी शरीरवर्धक पदार्थांचाही ते त्यात समावेश करतात. जडी- बुटीही जवळपास ८० प्रकारच्या मिसळून ते गुळाला एकप्रकारचे रामबाण औषधच बनवतात. त्यांच्या रोगनाशक व शक्तीवर्धक गुळाची जसजशी लोकांना प्रचिती येऊ लागली तसतसे लोक त्यांच्यापाशी हा महागडा गुळ खरेदी करण्यसाठी गर्दी करु लागले आहेत.

विक्रीसाठीही अनेक मार्गांचा वापर
ग्राहक आपला गुळ खरेदी करण्यासाठी घरी येत असले तरी तेवढ्यावरच सैनी यांनी समाधान मानलेले नाही. राज्यातील तसेच देशपातळवरीलही मोठ-मोठ्या कृषिप्रदर्शनात ते आपल्या ७७ प्रकारच्या गुळांचे स्टॉल टाकतात. त्यातही त्यांचा सोनेरी किंमतीचा गुळ ते लोकांना त्याच्या वैशिष्ट्यासह समजावून सांगतात. ग्राहकांच्या गरजांनूसारही गुळातील जडी-बुटीच्या प्रमाणात बदल करुन ते ग्राहकांना तो देतात. सध्या त्यांच्या ५ हजार रुपये किलो किमतीच्या गुळाची मागणी दरवर्षी ५०० किलो इतकी असल्याचे ते सांगतात. म्हणजे २५ लाख रुपये ते याचेच मिळवतात.

आता गन्ना कुल्फी बनविण्याचा विचार
सेंद्रिय गुणकारी औषधी गुळनिर्मितीत यशस्वी ठरल्यानंतर आता आपला व्यवसाय बच्चे कंपनीच्या आवडीनूसार आणखी वाढावा यासाठी त्यांनी आणखी नाविन्यपुर्ण विचार केली आहे. आता ते गन्ना कुल्फी व गन्ना जिलेबी बनविण्याच्या तयारीत आहेत. संजय सैनी यांच्या मार्गदर्शनातून सध्या देशभरात ६५० शेतकरी सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड करीत आहेत.

आईस्क्रीममध्येही आढळला कोरोनाचा विषाणू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या