25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयजळगावच्या जवानाचा दरीत कोसळल्याने मृत्यू

जळगावच्या जवानाचा दरीत कोसळल्याने मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुक्ताईनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना मोटारसायकल दरीत कोसळून जळगाव जिल्ह्यातील जवान विपिन खर्चे यांचा मृत्यू झाला आहे.

उद्या शासकीय इतमामात मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून ही माहिती देण्यात आली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करुन याची माहिती दिली असून श्रद्धांजली वाहिली आहे. निमखेडी या गावचे सुपुत्र नायब सुभेदार विपिन खर्चे यांचा जम्मू-काश्मीर इथल्या उधमपूर येथे कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला. त्यांची मोटारसायकल दरीत कोसळल्यानं त्यांचा मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या