25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयदहशतवादी संघटनांची यादी तयार होणार

दहशतवादी संघटनांची यादी तयार होणार

एकमत ऑनलाईन

समरकंद : शांघाय सहकार्य परिषदे (एससीओ) च्या सदस्य देशांच्या नेत्यांनी परिषदेच्या समारोपप्रसंगी एक संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करीत जगभरातील कोणत्याही स्वरूपातील दहशतवाद आणि दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध केला. दहशतवादी गटांचा मुकाबला करण्यासाठी सदस्य देशांनी बंदी घातलेल्या दहशतवादी, नक्षलवादी, फुटीरतावादी संघटनांची यादी तयार करण्याची योजनाही तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘एससीओ’च्या आठ सदस्य देशांच्या नेत्यांनी संयुक्त जाहीरनाम्यावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. सर्व प्रकारचा दहशतवाद, नक्षलवाद आणि फुटीरतावाद आणि दहशतवादी कारवायांचा निषेध त्यात नोंदविण्यात आला आहे. दहशतवाद, फुटीरतावाद्यांशी लढा देण्याच्या वचनबद्धतेला दुजोरा देत दहशतवादाच्या प्रसारासाठी पोषक परिस्थितीचा योग्यपणे मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करणे, दहशतवाद्यांच्या आर्थिक पुरवठ्याचे स्त्रोत बंद करणे, दहशतवादी संघटनांमधील भरती आणि सीमापार हालचाली, तरुणांचे कट्टरतावादाकडे आकर्षण, दहशतवादी विचारसरणीचा प्रसार याला पायबंद घालणे, दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून वापरल्या जाणा-या जागा आणि स्लीपर सेल नष्ट करणे आदी उपाय करण्यात येतील, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

आपापल्या देशातील कायद्यानुसार आणि सहमतीच्या आधारावर सदस्य राष्ट्रे समान तत्त्वे विकसित करण्याचा प्रयत्न करतील, असेही नमूद केले आहे. पत्रकारांशी बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, की देश व देशाबाहेरील दहशतवादाच्या आव्हानाबाबत ‘एससीओ’च्या प्रत्येक देशाला पूर्ण जाणीव आहे. रासायनिक आणि जैविक दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी सदस्य देशांनी रासायनिक शस्त्रांचा विकास, उत्पादन, साठा आणि वापराच्या परिषदेतील निषेधाच्या प्रस्तावाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. रासायनिक शस्त्रांच्या घोषित साठ्यांचा लवकर नाश करणे महत्त्वाचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

काय आहेत सूचना?
– अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापन करणे महत्त्वाचे.
– समाजातील सर्व जातीय, धार्मिक आणि राजकीय गटांच्या प्रतिनिधींचा सहभाग सरकारमध्ये हवा.
– दहशतवाद, युद्ध आणि अमली पदार्थांपासून मुक्त, स्वतंत्र, तटस्थ, संयुक्त, लोकशाही आणि शांततापूर्ण राज्य म्हणून अफगाणिस्तानची निर्मिती करण्यावर भर.
– इराणच्या आण्विक कार्यक्रमावर संयुक्त व्यापक कृती योजनेच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीचा विचार करणे महत्त्वाचे.
– जाहीरनाम्याच्या पूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी सदस्य देशांनी कटिबद्धतेची कठोरपणे अंमलबजावणी करावी.
-जागतिक हवामान बदलाचे परिणाम आणि कोरोनासाथीमुळे आर्थिक प्रगती, सामाजिक कल्याण आणि अन्न सुरक्षेपुढे तसेच शाश्वत विकासाच्या २०३० च्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आव्हान निर्माण झाले आहे.
अतिरिक्त आव्हाने, सामाजिक
अधिक समानता, प्रभावी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नवीन दृष्टिकोन आवश्यक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या