23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयएअर इंडियाचा मोठा अपघात टळला

एअर इंडियाचा मोठा अपघात टळला

एकमत ऑनलाईन

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर (आज) मंगळवारी मोठा अपघात टळला. रायपूरहून एअर इंडियाचे विमान क्रमांक एआयसी ४६९ दिल्लीसाठी उड्डाण करताच, एक पक्षी विमानाला धडकला. ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यांनतर त्यानंतर लगेच विमान धावपट्टीवर परतले. सर्व प्रवासी सुरक्षितपणे विमानातून उतरले. केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुका सिंहदेखील या विमानात होते, असे सांगितले जात आहे.

ही घटना धावपट्टी क्रमांक २४ वर सकाळी साडेदहा वाजता घडली. पायलटने हुशारीने विमान लँंड केले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर, अभियंत्यांकडून फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाली का हे तपासण्यात आले. रायपूर विमानतळाचे संचालक राकेश रंजन सहाय यांनी सांगितले की, एआयसी ४६९ या विमानाने १७९ प्रवाशांसह रायपूर वरुन दिल्लीसाठी सकाळी उड्डाण केले होते.

त्यानंतर एक पक्षी विमानाला धडकला. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. या घटनेनंतर प्रवासी उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळावरील कर्मचा-यांनी धावपट्टीच्या तपासणीदरम्यान पक्ष्यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या