30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयकेंद्र सरकारचा मोठा निर्णय; १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची एकूण परिस्थिती बघता १ मेपासून देशातील सर्व १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याची घोषणा सोमवार दि़ १९ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टास्क फोर्स, आरोग्य विभाग आणि औषध कंपन्यांच्या सोबत तीन तास चाललेल्या बैठकीनंतर केली आहे़ यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झाल्याचे चिन्हे दिसून येत आहेत़

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होताना दिसत आहे़ या पार्श्वभूमीवर देशात १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, आता १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

१ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे. यापूर्वी ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे नियोजित करण्यात आले होते़ मात्र कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात कोरोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे. सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयात एका डोससाठी २५० रुपये आकारले जात आहेत.

सीरमला ३००० तर बायोटेकला १५०० कोटींचा निधी
आगामी तिसºया टप्प्यातील प्रचंड मोठ्या लस निर्मिती आणि लसीकरणास वेग प्राप्त व्हावा म्हणून सर्वात मोठ्या लस निर्मिती करणाºया प्रयोगशाळा सीरम इन्सिटयूटला ३००० कोटी आणि बायोटेकला १५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरीसुध्दा दिली आहे़

खुल्या बाजारात होणार लस उपलब्ध
देशपातळीवर १ मेपासून लसीकरण मोहीम व्यापक होणार असून, शासकीय रुग्णालयासह खुल्या बाजारातही लस उपलब्ध होणार आहे़ यामुळे देशातील खासगी संस्था, कंपन्या, विविध आस्थापणे यांना आपल्या कर्मचारी किंवा सहकाºयांसाठी सदर लस विकत घेता येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे़

कमीत कमी वेळेत सर्वांना लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त भारतीयांना कमीत कमी वेळेत लस दिली जावी यासाठी सरकार मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहे. देशात लसीकरण वेगाने सुरु आहे, पुढेही ही गती कायम राहणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

इंग्लंड, अमेरिका, जपानच्या लसींना भारतात मंजुरीची गरज नाही
कोरोनाने देशात थैमान घातले असतानाच केंद्रातील मोदी सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातच, इंग्लंड, अमेरिका, जपान आणि डब्ल्यूएचओने ज्या कोरोना लसींना मंजुरी दिली आहे, त्या लसींना भारतात मंजुरी घेण्याची आवश्यकता नसेल, तसेच याचा परिणाम मे महिन्यापासून दिसायला सुरुवात होईल. असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दिला आहे. दरम्यान, आम्ही लसीकरणाची सुविधाही वाढवत आहोत. मे महिन्यापासूनच याचा निर्णयही दिसू लागेल.

नांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे ११ गुन्हे उघड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या