24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयपंजाबमध्ये एक आमदार, एक पेन्शन विधेयक मंजूर

पंजाबमध्ये एक आमदार, एक पेन्शन विधेयक मंजूर

एकमत ऑनलाईन

चंदिगढ : पंजाबमध्ये एकापेक्षा जास्त पेन्शन देणारा अनेक दशकापासूनचा जुना कायदा संपुष्टात आला आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी एक आमदार, एक पेन्शन या कायद्याला मंजुरी दिली आहे. पंजाबमध्ये मान सरकारने मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

त्यामुळे आतापासून आमदारांना केवळ एका टर्मसाठी पेन्शन मिळणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करून सांगितले आहे की, मला पंजाबी लोकांना कळवताना अतिशय आनंद होत आहे की, राज्यपाल यांनी एक आमदार-एक पेन्शन हा विधेयक मंजूर केला आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेच्या करात मोठी बचत होणार आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

२५० माजी आमदार पेन्शनाचा घेत आहेत लाभ
एक टर्म पूर्ण केल्यानंतर, कोणत्याही आमदाराला ७५ हजार रुपये पेन्शन मिळते. यानंतर त्यांना ७५ हजारांव्यतिरिक्त पुढील कार्यकाळासाठी ६६ टक्के पेन्शनची रक्कम उपलब्ध आहे. या विधेयकापूर्वी एखादा आमदार पाच वेळा निवडणूक जिंकला, तर त्याला पाच वेळा पेन्शन मिळू शकते, असा नियम होता. सध्या सुमारे २५० माजी आमदार पेन्शन सेवेचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर एक आमदार, एक पेन्शन कायदा लागू झाल्यानंतर आतापासून एका आमदाराला एकच पेन्शन मिळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या