27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयआयएनएस विक्रांतच्या श्रेयवादावरून नव्या वादाला सुरूवात

आयएनएस विक्रांतच्या श्रेयवादावरून नव्या वादाला सुरूवात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. एकीकडे आयएनएस विक्रांत नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाल्याने भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. मात्र, दुसरीकडे या युद्धनौकेच्या श्रेयवादावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचे श्रेय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

रमेश म्हणाले की, आयएनएस विक्रांत हे केवळ मोदी सरकारचे एकट्याचे यश नसून १९९९ नंतरच्या सर्व सरकारचे सामूहिक प्रयत्नांचे परिणाम असल्याचे म्हटले आहे. सर्व सरकारांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून, हे सत्य मोदी मान्य करतीय का? असा सवाल जयराम रमेश यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींना केला आहे.

जयराम रमेश यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारताची पहिलं स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत आज १९९९ पासून सर्व सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम आहे. पंतप्रधान ते मान्य करतील का? १९७१ च्या युद्धात या यद्धनौकेने चांगली कामगिरी केल्याचं सांगत कृष्णा मेनन यांचा ही युद्धनौका यूकेमधून आणण्यात मोलाचा वाटा होता याची आठवणदेखील रमेश यांनी मोदींना करून दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या