22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयभारत जोडो यात्रेवर निघाला खरा वाघ

भारत जोडो यात्रेवर निघाला खरा वाघ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडण्यात आले. तब्बल ७० वर्षांनंतर भारतात चित्त्यांनी पाऊल ठेवले. काँग्रेसने मोदी सरकारच्या या योजनेवर टीका करत भारत जोडो यात्रेवरुन लक्ष विचलीत करण्यासाठीचा इव्हेंट असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रोजेक्ट चित्त्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नाही याबाबत खंत व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी कधीच प्रशासन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचे स्वीकारत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.

जयराम रमेश यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी चित्ता भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करुन दिली. यावेळी त्यांनी केपटाउनमध्ये चित्त्यासोबत टिपलेला एक फोटो देखील ट्विट केला आहे. पंतप्रधान मोदी क्वचितच प्रशासन एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचे स्वीकारतात. चित्ता प्रोजेक्टसाठी २४-०४-२०१० रोजी केपटाऊनमधील माझ्या दौ-याचा साधा उल्लेखही न करणे हे याचे ताजे उदाहरण आहे. आज पंतप्रधान मोदींनी विनाकारण तमाशा केला. राष्ट्रीय प्रश्न आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून लक्ष विचलीत करण्यासाठी ते प्रयत्न करत आहे असे जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या