हैदराबाद : तेलंगणात यंदा विधानसभेचा रणसंग्राम रंगणार आहे. त्यासाठी भाजपाने तयारीला सुरुवात केली आहे. भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) भाजपा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
बीआरएसचे नेते आणि खम्मम मतदारसंघाचे माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर १८ जानेवारीला ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेणार आहेत.