25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीय‘टॅटू’साठी एकच सुई, १४ जणांना एड्स

‘टॅटू’साठी एकच सुई, १४ जणांना एड्स

एकमत ऑनलाईन

वाराणसी : सध्याच्या अनेक लोकांना टॅटू गोंदवून घेण्याचे वेड आहे. ही एक फॅशनची बाजू म्हणून बरेचजण टॅटू गोंदवून घेतात. मात्र याच टॅटूसंदर्भात उत्तर प्रदेशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

टॅटू गोंदवून घेणे उत्तर प्रदेशातील १४ जणांना महागात पडले आहे. वाराणसीमध्ये १४ जणांना टॅटूसाठी वापरण्यात आलेल्या सुईने मृत्यूच्या दाढेत ढकलले आहे.

या १४ जणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला आहे. त्या १४ जणांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांची ‘एचआयव्ही’ तपासणी करण्यात आली. या चाचणीमधून त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे या घटनेने खळबळ उडाली आहे.

र) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आपले पहिले छोटे उपग्रह प्रक्षेपण वाहन ‘एसएसएलव्ही-डी१’ प्रक्षेपित करून इतिहास रचला.

‘एसएसएलव्ही-डी १’ ने ७५० विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘आझादी सॅट’ आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह-०२ (इओएस-०२) उपग्रह देखील वाहून नेला आहे. देशातील सर्वात लहान रॉकेटचे प्रक्षेपण यशस्वी झाले असले तरी मोहिमेच्या अंतिम टप्प्यात शास्त्रज्ञांच्या पदरी निराशाच आली.

वास्तविक, इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, ‘एसएसएलव्ही-डी१’ ने सर्व टप्प्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आणि उपग्रहाला कक्षेतही ठेवले. परंतु मोहिमेच्या अंतिम टप्प्यात काही डेटा हरवल्याने उपग्रहाशी संपर्क तुटला आहे. इस्रो मिशन कंट्रोल सेंटर डेटा लिंक मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

भारतातील सर्वात लहान रॉकेट
‘एसएसएलव्ही-डी१’ हे देशातील सर्वात लहान रॉकेट आहे. ११० किलो वजनाचे एसएसएलव्ही हे घन अवस्थेतील सर्व भागांसह तीन-चरणांचे रॉकेट आहे. हे केवळ ७२ तासांत एकत्र केले जाऊ शकते. तर उर्वरित प्रक्षेपण वाहनाला सुमारे दोन महिने लागतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या