27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeराष्ट्रीयभारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारणार शिवरायांचा पुतळा

भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारणार शिवरायांचा पुतळा

एकमत ऑनलाईन

कुपवाडा : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील टीटवाल आणि कर्नाह सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा बसविण्यात येणार आहेत. दोन पुतळ्यांच्या उभारणीचे काम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. त्यासाठी नियोजन करणारी स्वयंसेवी संस्था भूमिपूजनासाठी शिवरायांच्या किल्ल्यांची माती घेणार आहे.

१४ फेब्रुवारी २०२३ रोजी, आम्ही पुणेकरने घोषणा केली की, ते भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून शत्रूंविरुद्ध लढणा-या सैनिकांना त्यांच्या आदर्श आणि नैतिक मूल्यांची प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे.

कुपवाडा प्रशासनाने दिली परवानगी
कुपवाडा जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेतली असल्याचे एनजीओच्या संस्थापकाने सांगितले. पुतळ्याच्या उभारणीचे भूमिपूजन मार्चअखेर होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. शिवरायांच्या पदचिन्हांनी पावन झालेल्या रायगड, तोरणा, शिवनेरी, राजगड आणि प्रतापगड किल्ल्यांची माती भूमिपूजनासाठी काश्मीरमध्ये आणली जाणार आहे.

भूमिपूजनासाठी एलओसीवर नेली जाणार किल्ल्यांवरील माती आणि पाणी

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या