श्रीनगर: वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील त्रालमधील सिमोह परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असताना एका दहशतवाद्यास कंठस्रान घालण्यात लष्कराला यश आले आहे.
या अगोदर पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सकाळापासून रविवार सकाळपर्यंत सीमेवरील चौक्यांसह रहिवासी भागांना लक्ष करत गोळीबार केला होता. कीरनीपासून बालाकोटपर्यंत शंभर किलोमीटर पेक्षा जास्त लांब नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून कुरपाती करणे सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात मेंढर सेक्टरमध्ये काही जनावरे देखील जखमी झाले तर घरांचेही नुकसान झाले आहे.
Read More राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय
तर, दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडूनही सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येणा-या गोळीबारास भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये सहा पाकिस्तानी सैनिक गंभीर जखमी झाले, शिवाय त्यांच्या काही चौक्या देखील उद्धवस्त झाल्या आहेत.