22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयचालत्या ट्रेनमध्ये कार्डने पेमेंट करून बनवता येईल तिकीट

चालत्या ट्रेनमध्ये कार्डने पेमेंट करून बनवता येईल तिकीट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधेसाठी सातत्याने बदल करत असते. यातच आता रेल्वेने एक नवे पाऊल उचलले आहे. यामुळे आता प्रवाशांना ट्रेनमध्येही भाडे अथवा दंड डेबिट कार्डच्या माध्यमाने भरता येणार आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चांगल्या पद्धतीने चालावीत म्हणून रेल्वे ती ४जी ने जोडत आहे. सध्या या उपकरणांत २ जी सीम असल्याने समस्या निर्माण होत आहेत.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिका-यांकडे पॉइंट ऑफ सेलिंग अर्थात पीओएस मशीनमध्ये २जी सिम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या येते. आता रेल्वेने आपल्या स्टाफकडील हँडहेड टर्मिनल सारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्ये ४ जी सिम टाकायला सुरूवात केली आहे. असे झाल्यानंतर, रेल्वे प्रवासी दंड अथवा भाडे रोख देण्याऐवजी ऑनलाईनही देऊ शकतात.

रेल्वे बोर्डाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील ३६ हजारहून अधिक ट्रेनमध्ये टीटींना पॉइंट ऑफ सेल मशीन देण्यात आले आहे. या उद्देश बिना तिकीट प्रवास करणा-यांना अथवा स्लिपरचे तिकीट काढून एसीने प्रवास करणा-यांना अधिकच्या देय रकमेसाठी हातो-हात तिकीट बनवून देणे आहे. या मशीन्सच्या माध्यमाने टीटी स्लीपर अथवा एसीच्या भाड्यातील अंतर काढून अ‍ॅक्सेस शेअरचे तिकीट बनवू शकतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या