नवी दिल्ली : केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव या पेगॅसस पाळत प्रकरणी केंद्र सरकारची बाजू राज्यसभेत मांडण्यास उभे राहिले होते. मात्र, तेव्हा विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांना बोलू दिले नाही. वैष्णव सरकारची बाजू मांडत असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार पुढे सरसावले आणि त्यांनी मंत्र्यांच्या हातून पेपर खेचून घेतले आणि फाडून टाकले. त्यामुळे राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे मंत्री अश्विनी वैष्णव यांना आपले म्हणणे पूर्ण करता आले नाही.
या प्रकरणी आता तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनु सेन यांना राज्यसभेतून चालू सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर तृणमूल काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने संसदेच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण झाला. त्यानंतर संसदेची कार्यवाही स्थगित करण्यात आली.
११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी काल गुरुवारी झालेल्या घटनेचा उल्लेख करत ते सभागृहामधील अशोभनिय वर्तन असल्याचा निर्वाळा दिला. त्यांनी म्हटले की, काले जे घडले ते निश्चितपणे चुकीचे होते़
बारामूला जिल्ह्यात दोन दहशतवादी ठार