28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयअरुणाचलमध्ये चीनने वसवले गाव

अरुणाचलमध्ये चीनने वसवले गाव

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गलवान खो-यातील तीव्र लष्करी संघर्षानंतर दोन्ही देशात लष्करी व राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू असतानाच चीनने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. चिंतेची बाब म्हणजे यावेळी चीनने अरूणाचल प्रदेशात गावच वसवले आहे. समोर आलेल्या सॅटेलाईट फोटोतून ही बाब स्पष्ट झाली आहे. चीनने तब्बल १०१ घरे बांधली असून, भारतीय सीमेपासून साडेचार किमी आतमध्ये येऊन चीनने हे बांधकाम केल्याचे एका खासगी वाहिनीने म्हटले आहे.

सॅटेलाईट फोटोतून दिसून आलेल्या दृश्यात चीनने अरुणाचलमध्ये हे गाव वसवले असून, सदर वाहिनीने या छायाचित्रांची तज्ज्ञांकडून पडताळणी केल्यानंतर वृत्त दिले आहे. हे फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजी आहेत. चीनने ओलांडून ४.५ किमी भारतीय हद्दीत घुसखोरी करून हे गाव वसवले असून, या गावात १०१ घरे बांधले असल्याचे म्हटले आहे. सरकारी नकाशानुसार हा भाग भारतीय हद्दीत येतो, मात्र, १९५९ पासून त्यावर चीनने कब्जा मिळवलेला आहे. पूर्वी इथे फक्त चिनी सैन्याची चौकी होती. मात्र, नव्या छायाचित्रात इथे गाव वसवण्यात आल्याचे दिसत आहे.

अरुणाचल प्रदेशात असलेल्या अप्पर सुबनशिरी जिल्ह्याच्या हद्दीत हा भूभाग येतो. त्सारी चू नदीच्या काठावर चीनने हे गाव वसवले असून, या भूप्रदेशावरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही देशांकडून या भागाला सशस्त्र लढाईची जागा म्हणून अधोरेखित करण्यात आलेले आहे. पूर्व लडाखमध्ये गेल्या मे महिन्यापासून भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे़ हा तिढा सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फे-या आतापर्यंत झाल्या आहेत. मात्र, चीनकडून सीमेवरील कुरापती सुरूच आहेत. चीनने गाव वसवल्याने भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

मैं देश झुकने नहीं दूँगा, आठवतेय का? – राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या विधानांचे स्मरण करून देत हल्लाबोल केला आहे. चीनने अरूणाचल प्रदेशात गावच वसवले आहे. या घटनेवर चिंता व्यक्त करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. चीनने अरुणाचलमध्ये गाव वसल्याच्या वृत्ताचा फोटो ट्विट करत मैं देश झुकने नहीं दूँगा, हे त्यांचे वचन आठवतेय का?, असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.

मी भरपूर खाज असलेला खासदार – उदयनराजेंची चौफेर फटकेबाजी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या