34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीय५६ लाख रुपयांना विकले गेले एक तोळे सोन्याचे नाणे

५६ लाख रुपयांना विकले गेले एक तोळे सोन्याचे नाणे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इतिहासाची साक्ष देणाºया अनेक वस्तू त्या काळाची माहिती सांगत असतात. अशा वस्तूंचे मुल्य अनन्य साधारण असते. कारण त्या वस्तू काळाच्या पडद्याआड दडलेली अनेक गुपितं खुली करतात. अशा ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करण्याचा शौक असणारे अनेक लोक असतात. अनेकदा अशा वस्तूंचे लिलाव केले जातात. या वस्तूंची किंमतही मोठी असते. जितकी जास्त दुर्मिळ वस्तू तितकी जास्त किंमत मिळते. नुकत्याच एका लिलावात मुघल साम्राज्याच्या काळातील एका दुर्मिळ सोन्याच्या नाण्याला तब्बल ५६ लाख रुपये किंमत मिळाली आहे. बंगळूरूमध्ये मरुधर आर्टसच्या वतीने आयोजित दुर्मिळ वस्तूंच्या लिलावात हे नाणे ठेवण्यात आले होते़

मुघल बादशहा औरंगजेब याचा पाचवा मुलगा मुहम्मद काम बख्श याच्या नावाच्या १०.९ ग्रॅम वजनाच्या दुर्मिळ सोन्याच्या नाण्याचा नुकताच लिलाव करण्यात आला. सुरुवातीला याची किंमत ४५ ते ५० लाख रुपये ठेवण्यात आली होती. त्यावर बोली वाढत वाढत अखेर ५६ लाख रुपयांना याची विक्री झाली.
याबाबत अधिक माहिती देताना मरुधर आर्टसचे सीईओ राजेंद्र मारू म्हणाले की, विजापूरातील दार -उज-जाफर या टांकसाळीत तयार झालेल्या या नाण्यावर फार्सी भाषेत काही शब्द लिहिले आहेत. मात्र हे नाणे फारसे चलनात नव्हते, त्यामुळे ते अधिक दुर्मिळ आहे. या नाण्याची खरेदी करणाºया व्यक्तीचे नाव जाहीर करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

मुहमद कम बख्श अनेक लढायां लढला. १७०७ मध्ये त्याने विजापूरच्या किल्ल्यावर कब्जा करून स्वत:ला राजा घोषित केले होते़ हैदराबाद, गुलबर्गा (सध्याचे कलबुर्गी), शहापूर आणि विकीनखेडा जिंकण्याबरोबरच त्यानं दक्षिणेतील अनेक भाग जिंकले होते, मात्र राज्य करण्याचा फारसा अनुभव नसल्याने अल्पावधीतच त्याचे राज्य लयाला गेले. औरंगजेबचा मोठा मुलगा शाह आलम बहादूर याने जेव्हा मुघल साम्राज्याची सूत्रे हाती घेतली़ तेव्हा त्याने मुहमद कम बख्शच्या स्वत:च्या नावाने नाणी बनवून घेण्यावर नाराजी व्यक्त केली होती. यावरून त्या दोघांमध्ये मोठी लढाई झाली. यात मुहमद कम बख्श गंभीररीत्या जखमी झाला. त्याला पकडण्यात आले, मात्र दुसºयाच दिवशी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मरुधर आर्टसच्या वतीने देण्यात आली.

लॉक डाउनची कळमनुरीत कडक अमल बजावणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या