30.8 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeराष्ट्रीयशेतात गाय घुसल्यामुळे महिलेला बांधून मारहाण

शेतात गाय घुसल्यामुळे महिलेला बांधून मारहाण

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : महिला शोभम्माचे हे छायाचित्र उजेडात आले आहे. त्यात अमरीशने महिलेला आपल्या घरापुढील अंगनात बांधल्याचे दिसून येत आले. महिला शोभम्माचे हे छायाचित्र उजेडात आले. त्यात अमरीशने महिलेला आपल्या घरापुढील अंगनात बांधल्याचे दिसून येत आहे.

कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील रामपूर गावात एका दलित महिलेची गाय सवर्ण जातीच्या एका व्यक्तीच्या शेतात शिरली. शोभम्मा हरिजन नामक ही महिला आपल्या गायीला परत आणण्यासाठी अमरेश कुंबर यांच्या शेतात गेली. यामुळे नाराज झालेल्या कुंबरने महिलेला आपल्या घराच्या अंगणात बांधून तिला चप्पलेने बेदम मारहाण केली. महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी आरोप केला आहे की आरोपी अमरेश मागील अनेक दिवसांपासून दलितांसोबत असा व्यवहार करत आहे. ही घटना गत ३ फेब्रुवारीची आहे. कनकगिरी पोलिसांनी कुंबरविरोधात एसटी/एससी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच अमरेशला अटकही केली आहे.

९ वर्षीय मुलीने तयार केला व्हीडीओ
शोभम्मांसोबत असे गैरवर्तन सुरू असताना तिची ९ वर्षीय मुलगीही तिथे उपस्थित होती. यासंबंधीच्या वृत्तानुसार अमरेशने तिच्या आईला बांधल्यानंतर तिने धावत जाऊन घरातून मोबाईल आणला. त्यानंतर तिने आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी या घटनेचा व्हीडीओ चित्रित केला. हा व्हीडीओ फार सुस्पष्ट नाही. पण व्हीडीओत अमरेश, शोभम्मांना मारताना दिसून येत आहे. तसेच शोभम्माच्या आर्त किंकाळ्याही ऐकावयास मिळत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या