22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयआपचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन

आपचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन सुरू झाले आहे. आम आदमी पार्टी आज भाजपविरोधात दिल्लीत मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहे. आपचे अशा प्रकारचे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनाला आपचे खासदार आमदारांपासून देशाचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय जन प्रतिनिधी अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या लोकप्रतिनिधी परिषदेत २० राज्यातील १ हजार ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या अधिवेशनात आप भाजपविरोधात मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहे. ऑपरेशन लोटसच्या मुद्यावरून आपचे नेते भाजपला घेरण्याची शक्यता आहे. तसेच अरविंद केजरीवाल देखील मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचा विस्तार, संघटनेची ताकद यावर केजरीवाल चर्चा करणार आहेत. सकाळी साडे अकरा वाजता केजरीवाल मार्गदर्शन करणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या