24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयअभिनव बिंद्राने घेतली नीरज चोप्राची भेट

अभिनव बिंद्राने घेतली नीरज चोप्राची भेट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रा याने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या नीरज चोप्रा याची भेट घेतली. बिंद्राने नीरजला एक गोंडस गिफ्ट देखील दिले. नीरजला गुडलक म्हणून अभिनव बिंद्राने एक श्वानाचे पिल्लू गिफ्ट म्हणून दिले आहे. विशेष म्हणजे या पिल्लाचे नाव ‘टोकियो’ असे आहे. अभिनव बिंद्राने त्याच्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे.

भारताचा गोल्डन मॅन नीरज चोप्राची आज भेट घेऊन अतिशय आनंद झाला. टोकियो तुझ्यासाठी नक्कीच एक उत्तम मित्र ठरेल आणि २०२४ साली पॅरिस नावाचा त्याचा भाऊ तुला भेट म्हणून मिळवून देण्यासाठी तुला टोकियो प्रोत्साहन देईल अशी आशा आहे, असे ट्विट अभिनव बिंद्राने केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या