नवी दिल्ली : भारतात पर्यटनासाठी आलेल्या जपानी तरूणीसोबत भारतीय तरूणांनी गैरवर्तन केल्याचा प्रकार आहे. होळीच्या दिवशी हा प्रकार घडला असून काही तरूणांनी मिळून जपानी तरूणीशी गैरवर्तन करत तिला बळजबरीने भिजवले आणि रंग लावल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हीडीओमध्ये काही तरूण होळीच्या दिवशी रंग खेळताना दिसत आहेत. तर तीन ते चार जण जपानी मुलीच्या अंगाला बळजबरीने रंग लावताना या व्हीडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर ही तरूणी तिथून निघून गेल्याचे व्हीडीओमध्ये दिसत असून हा व्हीडीओ अनेकांनी शेअर केला आहे. दरम्यान, यावर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला असून आपल्या घरातील महिलेसोबत आपण असे वर्तन करू का अशा शब्दांत तरूणांना सुनावले आहे. पण ही घटना कुठे घडली आहे? आणि या व्हीडीओतील मुलगी खरोखर जपानी आहे की नाही याची माहिती समोर आली नाही.