24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयकर्नाटकात राजकीय हालचालींना वेग

कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग

एकमत ऑनलाईन

बेंगळुरू : उत्तराखंडनंतर आता कर्नाटक भाजपमध्ये हालचालींना मोठा वेग आला आहे. यातच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भातील वृत्ताचे खंडन केले आहे. या बातम्या अफवा असल्याचे म्हणत, आपण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राज्याच्या विकासासंदर्भात चर्चा केली आहे. राजीनामा देण्यासंदर्भातील वृत्तात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही, असे येदियुरप्पा यांनी म्हटले आहे.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना येदियुरप्पा म्हणाले, मी दिल्लीत पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली. मेकेदातू प्रकल्पासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली. मी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दिल्लीला जाणार आहे. नड्डा यांच्यासोबत मी कर्नाटक भाजपसंदर्भात चर्चा केली. मी राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार बनविण्यासाठी काम करेल.

मुलासाठी केंद्रात मंत्रीपदाची इच्छा?
बीएस येदियुरप्पा राजीनाम्यासंदर्भातील वृत्त नाकारत असले तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येदीयुरप्पा यांनी प्रकृती आणि वय लक्षात घेत राजीनामा द्यावा, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. तसेच येदियुरप्पा यांनीही राजीनामा देऊ केला आहे, असेही सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे, मानले जाते, की पुढील एक ते दोन दिवसांत ते खुर्ची सोडू शकतात. तसेच मुलाला केंद्रीय मंत्रीमंडळात पद मिळावे, अशीही येदियुरप्पा यांची इच्छा असल्याचे समजते.

शरद पवारांना बळीचा बकरा करू नये

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या