22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयसावधगिरीने वाहन चालवून झालेला अपघात निष्काळजी नाही

सावधगिरीने वाहन चालवून झालेला अपघात निष्काळजी नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मागील काही दिवसांपूर्वी वाहन चालक आणि अपघाताबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात, जर एखादा व्यक्ती सावधपणे गाडी चालवत असेल आणि तरीही अपघातापासून वाचू शकला नाही, तर ही बाब बेजबाबदारपणा मानला जाणार नाही असे म्हटले होते. एक महिला आणि तिच्या दोन मुलांच्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला होता.

हे प्रकरण २०११ सालातील कर्नाटकातील आहे. कर्नाटकात ट्रक आणि कारच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी संपूर्ण प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचले, त्यावेळी उच्च न्यायालयाने ट्रक आणि कार चालक दोघांनाही समान दोषी ठरवले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला चुकीचे ठरविले. खबरदारी घेऊनही धडक टाळता आली नाही, म्हणजे हा निष्काळजीपणा ठरू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

याप्रकरणी सर्वात आधी कर्नाटक उच्च न्यायालयाने दोषी ठरवत जो निर्णय दिला, तो पुराव्यांवर आधारित नाही. उच्च न्यायालयाने केवळ एका गृहितकावर निर्णय दिला, जो न्यायसंगत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सावधपणे गाडी चालवत असतानाही धडक झाल्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले, की कार चालक ट्रॅफिक नियमांतर्गत सावधपणे कार चालवत असता, तर ही घटना घडली नसती. परंतु उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवत, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी वेळी सांगितले, की असा कोणताही पुरावा किंवा रेकॉर्ड नाही ज्यात कार चालक मध्यम स्पीडमध्ये कार चालवत नव्हता किंवा ट्रॅफिक नियमांचे पालन करत नव्हता, असे आढळले नाही.

पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला. यावरच काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मृत कार चालकाची पत्नी आणि दोन मुलांचे अपील स्वीकारत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला. त्याशिवाय पीडिताच्या कुटुंबियांना ९ टक्के व्याज दराने ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले.

पीडित कुटुंबाला मिळाला न्याय
२०११ साली ही घटना घडली होती. कारची ट्रकला धडक लागली, त्यात कार चालकाचा मृत्यू झाला. कार चालकाच्या पत्नी आणि मुलांनी ट्रक चालकाने अचानक ट्रक थांबवला. त्यामुळे कार आणि ट्रकची टक्कर झाल्याचा आरोप केला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या