25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयसोनालीच्या लॉकर्सचा आरोपींना अ‍ॅक्सेस होता

सोनालीच्या लॉकर्सचा आरोपींना अ‍ॅक्सेस होता

एकमत ऑनलाईन

पणजी : दिवंगत भाजपच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यांच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाल्यानंतर आता सोनाली यांच्या सिक्रेट लॉकर्सचा आरोपीला थेट अ‍ॅक्सेस होता ही ताजी माहिती समोर आली आहे. यामुळे आरोपीची नजर सोनाली फोगाट यांच्या संपत्तीवर होती असे सांगितले जात आहे.

सोनाली फोगाट यांचा जवळचा सहकारी असलेला आणि त्यांच्या हत्येचा प्रमुख सुत्रधार असलेला आरोपी सुधीर संगवान जो सध्या तुरुंगात आहे. त्याला सोनाली फोगाट यांच्या सिक्रेट लॉकर्सचा अ‍ॅक्सेस होता. दरम्यान, सोनाली यांचे इलेक्ट्रॉनिक लॉकर पासवर्डविना अनलॉक करण्यात अपयशी ठरल्यानंतर पोलिसांनी हे लॉकर सील केले आहे. तसेच सोनाली यांच्या तीन डाय-याही पोलिसांना सापडल्या आहेत. दरम्यान, सोनाली फोगाट यांच्या पुतण्याने नुकताच आरोप केला होता की, सुधीर संगवान याने सोनाली यांना गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जची सवय लावली होती. तपासादरम्यान पोलिसांनी कर्लीज सेस्तराँचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा हे समोर आले की, सुधीर सोनाली यांच्या हातातील ड्रिंक्समध्ये जबरदस्तीने कुठलंतरी ड्रग्ज मिसळत होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या