24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयटायपिस्टच्या चुकीने बलात्कारातील आरोपी सुटला

टायपिस्टच्या चुकीने बलात्कारातील आरोपी सुटला

एकमत ऑनलाईन

चेन्नई : टायपिस्टकडून झालेली एक चूक काय करु शकते, हे दाखवून देणारी घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. टायपिस्टने सीमेन ऐवजी सेमन टाईप केल्यामुळे मोठा अनर्थ घडला आहे. सेमनचा तमिळ अर्थ लाल माती असा होता. एका टायपिस्टने केलेल्या या चुकीमुळे बलात्कारातील आरोपीची सुटका झाली. मात्र, त्यानंतर मद्रास हाय कोर्टाच्या लक्षात ही चूक आली आणि त्यांनी खालच्या कोर्टाचा निर्णय बदलला.

दोन वर्षांच्या लहान मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका महिलेने तक्रार दाखल केली होती. मद्रास हाय कोर्टाचे न्यायाधीश पी वेलमुर्गन यांनी हा निर्णय बदलला. २०१७ मध्ये हा खटला दाखल झाला होता. ज्या महिलेने तक्रार दाखल केलीय, तिच्या दोन वर्षे ९ महिन्यांच्या मुलीवर शेजारच्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत या आरोपीवर गुन्हा दाखल केला होता.

इंधन तुपापेक्षाही महागले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या