22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयआरोपींना हजर राहण्याचे आदेश, उद्या बाबरी खटल्यावर सीबीआयचे न्यायालय निकाल देणार

आरोपींना हजर राहण्याचे आदेश, उद्या बाबरी खटल्यावर सीबीआयचे न्यायालय निकाल देणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बाबरी खटल्यावर सीबीआयचे न्यायालय उद्या (३० सप्टेंबर) निकाल देणार आहे. यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण ३२ जण आरोपी आहेत. कोरोना महामारी लक्षात घेता यातील काही आरोपींनी निकालवेळी प्रत्यक्ष हजर न राहण्याची परवानगी मिळण्याची विनंती केल्यास, तशी मुभाही न्यायालयाकडून मिळू शकते.

देशात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना प्रत्यक्षात हजर न राहण्याची परवानगी मिळू शकते. तशी विनंतीही आडवाणी, जोशी यांचे वकील के. के. मिश्रा न्यायालयाला करणार असल्याची माहिती मिळत आहे.

प्रत्यक्ष हजर राहण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची विनंतीही ते कोर्टाला करु शकतात. तसेच शिवसेना नेते विनय कटियार, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहू शकणार नसल्याचे न्यायालयाला यापूर्वीच सांगितलं आहे. तर लल्लू सिंह कोरोनाग्रस्त आहेत, तर महंत नृत्यगोपाल दास विलगीकरणात आहेत.

धर्माबाद येथील मालमत्ता करमुल्यांकनचे प्रस्ताव धुळखात, पालिकेचा करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या