25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयसार्वजनिक ठिकाणी पुरूष ‘हाफ पॅन्ट’मध्ये दिसल्यास कारवाई

सार्वजनिक ठिकाणी पुरूष ‘हाफ पॅन्ट’मध्ये दिसल्यास कारवाई

एकमत ऑनलाईन

बागपत : आतापर्यंत मुलींनी कोणता पेहराव करावा, कोणत्या पद्धतीचे कपडे घालावते, काय वापरावे काय वापरु नये यासंदर्भात अनेक वादग्रस्त निर्णय देणाºया बालियान खाप पंचायतीचे प्रमुख आणि भारतीय किसान संघटनेच्या अध्यक्षांनी आता मुलांच्या कपड्यांबद्दल सूचना जारी केल्यात. बागपतमध्ये खापचे प्रमुख नरेश टिकैत यांनी पुरुषांनी बाजारांमध्ये हाफ पॅण्ट घालून फिरु नये, असे म्हटले आहे. या आदेशाचे पालन केले नाही तर सामाजिक स्वरुपाचा दंड करण्यात येईल असेही म्हटले आहे.

मुलींनी यापूर्वीच मुलांवरही निर्बंध लावण्याची मागणी केली होती, असेही नरेश यांनी म्हटले आहे. यापूर्वी खाप पंचायतीने मुलींनी जीन्स पॅण्ट घालू नये तसेच, मोबाईल वापरु नये यासंदर्भात निर्णय दिले होते. या निर्णयांवरुन त्या त्यावेळी चांगला वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या निर्णयांचा विरोध करत खाप पंचायतीवर टीका केली होती. ग्रामीण भागातील मुलांनी हाफ पॅण्ट घालणे अयोग्य आहे, असेही नरेश यांनी म्हटले आहे. मुलांनी हाफ पॅण्ट घालवण्यावर निर्बंध आणावेत, असा सल्ला आमच्या वरिष्ठांनी दिली आहे. आम्ही यापूर्वीही खाप पंचायतींच्या माध्यमातून मुलींनी जीन्स घालू नये, यासंदर्भात निर्बंध लागू केले होते, असेही नरेश म्हणाले.

खाप पंचायतीचा इतिहास
भारतामध्ये स्वातंत्र्याचा लढा सुरु होता़ त्याचवेळी पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील गावागावांमध्ये सर्वजातीय आणि सर्व धर्मांतील वरिष्ठ व्यक्तींचा समावेश असणाºया लोकांनी एकत्र येऊन क्रांती घडवून आणण्याची निर्धार केला. एकीकडे १८५७ मध्ये मेरठमधील लष्करी छावणीत मंगल पांडे यांनी क्रांतीचे बिगुल वाजवले़ तर दुसरीकडे मुजफ्परनगरमधील बुलढाणा तहसीलमधील सौरम गावातील खाप चौधºयांनी महा पंचायतची स्थापना करुन इंग्रजांविरुद्ध लढा लढण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी खापची पहिली बैठक झाली होती. यामध्ये हिंदू, मुस्लिमांबरोबरच इतर धर्मातील लोकांचाही समावेश होता. अनेक राज्यांमधील शेतक-यांनाही त्यावेळी यामध्ये सहभाग नोंदवला होता. २००४ साली खाप पंचायतींनी पुन्हा फर्मान जारी करण्यास सुरुवात केल्यानंतर यासंदर्भातील घटना समोर येऊ लागल्या.

खापचे यापूर्वीचे निर्णय
सगोत्र विवाहांवर निर्बंध लावत एकाच गोत्रामध्ये आणि एकाच गावात प्रेम विवाह करणा-या जोडप्यांची हत्या करण्याचे फर्मान खापने सुनावले होते़ २०१० साली सिसोली गावातील मुलींनी जीन्स घालू नये हे फर्मानही त्यांनी सुनावले होते. त्यानंतर मुलींनी मोबाईल वापरु नये, असेही पंचायतीने एका निर्णयामध्ये म्हटले होते़

मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबतच्या अर्जावर लवकरच निर्णय

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या