25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयबँक कर्मचा-यांने टाळाटाळ केल्यास कारवाई

बँक कर्मचा-यांने टाळाटाळ केल्यास कारवाई

एकमत ऑनलाईन

मुंबई : बँक कर्मचा-यांच्या दिरंगाईचे किस्से रोज ऐकायला मिळतात. तुमच्यासोबत असे झालेही असेल की तुम्ही महत्त्वाच्या कामामुळे बँकेत पोहोचलात आणि बँक कर्मचारी तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर यायला सांगतात. तुम्ही वेळेवर पोहोचल्यावर कर्मचारी जागेवर भेटत नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे तर बँक कर्मचारी तुम्हाला तुमच्या कामासाठी इकडून तिकडे फिरायला भाग पडतात. तुम्ही याबद्दल तक्रार करू शकता आणि जबाबदारांवर कारवाई करू शकता.

ग्राहकांना बँकिंग सेवांशी संबंधित काही अधिकार असतात, ज्यांच्या माहितीच्या कमतरतेच्या अभावी ते लाभ घेऊ शकत नाहीत. बँकेत ग्राहकांना असे अनेक अधिकार मिळतात, जे सहसा ग्राहकांना माहीत नसतात. त्यात बँकेने ग्राहकांशी नीट वागणे महत्त्वाचे आहे. अर्थात, बँकेच्या कर्मचा-यांकडून ग्राहकांना चांगली वागणूक मिळणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास किंवा सातत्याने इकडून-तिकडे फिरण्याची वेळ आल्यास संबंधितांविरोधात तक्रार देता येऊ शकते.
बँकेच्या ग्राहकांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, त्याबाबत माहिती नसल्याने कर्मचा-यांच्या टाळाटाळीला तोंड देत ते शांत बसतात.

कोणत्याही बँकेच्या कर्मचा-याला तुमचे काम करण्यास उशीर झाला, तर तुम्ही त्या बँकेच्या व्यवस्थापक किंवा नोडल ऑफिसरकडे तक्रार करू शकता. याशिवाय जवळपास प्रत्येक बँकेत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण मंच असतो, ज्याद्वारे तुम्ही तुमची तक्रार सोडवू शकता. त्यामुळे बँकेत तशी गैर वागणूक मिळाल्यास थेट तक्रार करता येऊ शकते.

बँकेने योग्य वर्तन न केल्यास ग्राहकांना थेट रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) संपर्क साधण्याचा अधिकार आहे. असे कोणतेही प्रकरण तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही बँकिंग लोकपालकडे तक्रार करून तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता, असे सांगण्यात आले.

तक्रार निवारण क्रमांकावर संपर्क करा
तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल, त्या बँकेच्या कर्मचा-यांच्या तक्रारीसाठी तुम्ही बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तक्रार करू शकता. याशिवाय बँकेच्या टोल फ्री क्रमांकावरही समस्या सांगू शकता. याशिवाय काही बँका ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा देतात.

बँकिंग लोकपालला समस्या कळवा
बँक कर्मचा-यांच्या निष्काळजीपणाबद्दल तुम्हाला बँकिंग लोकपालकडे तक्रार करायची असल्यास तुम्ही तुमची तक्रार फोन करून किंवा ऑनलाइन पाठवू शकता. तुमची तक्रार ऑनलाईन नोंदविण्यासाठी तुम्ही वेबसाइटवर लॉगइन करू शकता आणि तक्रार दाखल करू शकता. बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १४४४८ असून, त्यावर कॉल करूनही ग्राहक तक्रारी करू शकतात, असे सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या