26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयबंडखोरांवर येत्या दोन ते तीन दिवसांत कारवाई : शरद पवार

बंडखोरांवर येत्या दोन ते तीन दिवसांत कारवाई : शरद पवार

एकमत ऑनलाईन

दिल्ली : बंडखोरांनी आपल्या पाठीमागे राष्ट्रीय पक्ष असल्याचं सांगितलं पण भाजपशिवाय दुसरा पाठिंबा देणारा पक्ष कोणता आहे? असं म्हणत शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं आहे. पण आमची उद्धव ठाकरे यांच्यासोबत कमिंटमेंट आहे, आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. बंडखोरांवर कारवाई करायची का नाही ते उद्धव ठाकरे ठरवतील. येत्या दोन तीन दिवसांत कारवाई होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते गेले आहेत. उद्या सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. दरम्यान राज्यातील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर बोलताना बंडखोर आमदार परत आल्यावर त्यांनी आपली भूमिका बदललेली असेल असं ते म्हणाले.

संजय राऊत यांनी ४० मृतदेह परत येतील हे विधान मी ऐकलं नाही पण गेलेले आमदार नक्कीच परत येतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. आजही आमची आघाडी असून आघाडी टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा असेल असं पवार म्हणाले आहेत.

जर राज्यात राष्ट्रपती राजवट आली तर भाजपने एवढं केलं त्याचा फायदा काय?” असा प्रश्न त्यांनी केला आहे. बंडखोरांनी गुजरात आणि आसाम हे दोन राज्य निवडले आहेत त्या राज्यात भाजपचे सरकार आहे. बंडखोरांकडे संख्याबळ असेल तर ते गुवाहटीत का थांबले आहेत? असे प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केले आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या