31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeआंतरराष्ट्रीयदहशतवादाचं समर्थन करणाऱ्यांवर देशावर पण कारवाई व्हावी: पंतप्रधान मोदी

दहशतवादाचं समर्थन करणाऱ्यांवर देशावर पण कारवाई व्हावी: पंतप्रधान मोदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनात व्हर्च्युअल माध्यमातून पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटलं कि दहशतवाद हे सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवादाला समर्थन देणारे आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ब्रिक्स शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. “दहशतवाद हे आपल्या जगातील सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.”

सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची आवश्यकता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. भारत बहुपक्षीय व्यवस्थेचा समर्थक आहे.

“संयुक्त राष्ट्राच्या तत्वांसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेला हातभार लावत आहोत. मात्र, आता ते एका संकटातून जात आहे कारण काळानुसार यामध्ये बदल झालेले नाहीयेत. संयुक्त राष्ट्रात वेळेनुसार बदल होण्याची गरज आहे. विशेषत: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बदल होणे गरजेचे आहे आणि आम्ही यामध्ये ब्रिक्सकडून सहकार्याची अपेक्षा करतो.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समूह आहे. आधी यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश नव्हता. तेव्हा हा गट केवळ ‘ब्रिक’ म्हणूनच ओळखला जायचा. 2010 साली दक्षिण आफ्रिका सहभागी झाल्यानंतर हा समूह ‘ब्रिक्स’ बनला.

ब्रिक्स देशांची पहिली परिषद 2009 साली झाली होती. त्यानंतर दरवर्षी ही परिषद सदस्य देशांमध्ये आयोजित केली जाते. यावर्षी ही परिषद रशियाममध्ये 21-22 जुलैला होणार होती. पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली आणि आता 17 नोव्हेंबरला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडत आहे.

केवळ लसीमुळे कोरोनावर मात करणं शक्य नाही; WHO चे प्रमुख टेड्रोस घेब्रेसेस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या