30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयअभिनेत्री खुशबू यांच्या गाडीला अपघात

अभिनेत्री खुशबू यांच्या गाडीला अपघात

एकमत ऑनलाईन

चैन्नई : दक्षिणेतील स्टार अभिनेत्री आणि अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या खुशबू सुंदर यांच्या कारला अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून सुशबू सुंदर थोडक्यात बचावल्या आहे. या अपघाताच्या मागे घातपात असल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे.

आज सकाळी खुशबू सुंदर यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात मेलमरवाथूरजवळ झाला. खुशबू सुंदर एका कार्यक्रमासाठी कडलोरे इथे जात होत्या, त्यावेळी हा अपघात घडला. याबद्दल खुशबू सुंदर यांनी ट्वीट करून घटनेची माहिती दिली. आमची गाडी ही योग्य लेनमधून चालली होती.

मात्र, अचानक एका भरधाव टँकरने आमच्या कारला जोरात धडक दिली. कारच्या डाव्याबाजूला ही जबर धडक बसली. आमची कार ही टँकरवर आदळली नाही, असे खुशबू सुंदर यांनी सांगितले.

शासकीय खर्चात वरवरा राव यांचा उपचार करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या