20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयअदानी ग्रुप माध्यम क्षेत्रात

अदानी ग्रुप माध्यम क्षेत्रात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील बडा उद्योग समुह असलेला अदानी ग्रुप आता माध्यम क्षेत्रात प्रवेश करणार आहे. यासाठी वरिष्ठ पत्रकार संजय पुगालिया यांच्यावर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुगालिया यांची अदानी एन्टरप्रायझेसमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तसेच ग्रुपच्या नव्या माध्यम उपक्रमामध्ये एडिटर इन चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पुगालिया हे क्वींट डिजिटल मीडिया लिमिटेडच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाले होते.

अदानी कंपनीच्या अंतर्गत निवेदनाद्वारे पुगालिया यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. पुगालिया यांना राजकीय आणि बिझनेस पत्रकारितेचा मोठा अनुभव आहे. क्वींटमध्ये येण्यापूर्वी त्यांनी यापूर्वी सीएनबीसी आवाज, टीव्ही १८ आणि सीएनबीसी या हिंदी बिझनेस वृत्तवाहिनीत मध्ये मुख्य संपादक म्हणून काम केले आहे.

राष्ट्र उभारणीचा उपक्रम
संजय पुगालिया यांच्या नियुक्तीची घोषणा करताना अदानी ग्रुपने म्हटले की, अदानी समूहाच्या विविध व्यवसायांमध्ये आणि राष्ट्र उभारणीच्या आमच्या उपक्रमांमधील मीडिया, कम्युनिकेशन आणि ब्रँडिंगमध्ये पुगालिया यांच्या व्यापक अनुभवाचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पुगालिया यांच्यावर प्रणव अदानी यांच्यासोबत काम करणार आहेत. प्रणव अदानी हे अदानी ग्रुपच्या अ‍ॅग्रो, ऑईल आणि गॅस कंपन्यांचे तसेच अदानी एन्टरप्रायझेसमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या